HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

“जेव्हा कल्याणराव परत साहेबांकडे जायला लागले तेव्हा भाजपच्या पोटात दुखायला लागलं”

पंढरपूर | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा प्रचार केला. यावेळी भाषण करताना अजित पवारांना “मास्क काढा” असं लिहिलेली चिठ्ठी आली. त्यावर अजितदादांनी “मी जनतेला सांगतो मास्क वापरा आणि हा शहाणा सांगतो मास्क काढा” असं मिश्कील भाष्य केलं. दरम्यान, आज अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपचे नेते कल्याणराव काळे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

“भाजप नेत्यांच्या पोटात दुखायला लागलं”“कल्याणराव काळे पवार साहेबांकडे चालले, असं समजलं की भाजप नेत्यांच्या पोटात दुखायला लागलं. भाजपचे सगळेच कल्याणरावांच्या घरी जायला लागले. शरद पवार साहेबांचा कल्याणराव काळे यांना निरोप आहे, की भगीरथ चांगल्या मतांनी निवडून आला पाहिजे.” असं अजितदादांनी कल्याणरावांना सांगितलं होतं.दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीच्या तोंडावर भाजपला धक्के बसत आहेत. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या दौऱ्यात त्यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. मनधरणीसाठी आलेल्या खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी अजित पवारांबरोबर ठरलंय? असा निरोप दिल्यानं निंबाळकर परतले होते.

काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. याची कुणकुण लागताच खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी सोमवारी दुपारी कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालयात मनधरणीसाठी गेले होते. त्याचवेळी संजय शिंदे आल्याने दोघांचीही पंचाईत झाली होती. कल्याणराव काळे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी भाजप नेत्यांनी त्यांच्या अडचणीत असलेल्या कारखान्याला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर ते आश्वासन पाळले नसल्याने काळे भाजपवर नाराज होते. ते राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. मात्र, अधिकृत प्रवेश केला नव्हता.

पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करू- कल्याणराव काळे

विशेष म्हणजे त्या कार्यक्रमात कल्याणराव काळे यांनी केलेल्या एका वक्तव्याचीही चांगलीच चर्चा झाली होती. आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करू, असे कल्याण काळे यांनी म्हटले होते. पवार साहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुरांडे पेटले. आमच्यापण काही चुका झाल्या, परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले होते. कल्याणराव काळे यांनी २०१४ मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून ६५ हजार मते मिळवली होती. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कल्याणराव काळेंनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला माढ्यासारख्या बालेकिल्ल्यातच खिंडार पडले होते.

कोण आहेत कल्याणराव काळे ?
  • कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्यातील मोठे नेते
  • विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश
  • माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात मोठा जनाधार
  • राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, आरोग्य क्षेत्रातही मोठं काम
  • सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष
  • सिताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापक
  • श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष
  • सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष
  • सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष
  • राज्य सहकारी साखर संघाचे माजी उपाध्यक्ष

Related posts

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी !

News Desk

“आमची अजित पवारांशी ७२ तासांची मैत्री आजही कायम…”, मुनगंटीवारांचे सूचक वक्तव्य  

News Desk

मुस्लिम समाजावर सरकार अन्याय का करत आहे ?

News Desk