HW News Marathi
महाराष्ट्र

झोपेत असताना सरकार जाईल हे वक्तव्य पाटलांनी जागेपणीचं केलं ना?, अजित पवारांचा पलटवार

बारामती | विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. अशात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा आणि त्यावरुन एकमेकांना टोले लगावण्याचा सपाटा अजूनही सुरुच आहे. पुन्हा एकदा यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शाब्दिक चकमक झाली आहे.

ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, अशी नवी गर्जना करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना की झोपेत केलं होतं, असा उलट प्रश्न अजित पवारांनी विचारला आहे.

आज (२९ मे) बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ज्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार आलं, तेव्हापासून भाजप नेत्यांना असह्य झालंय. त्यांना आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत असतं. कार्यकर्त्यांनी सोबत रहावं यासाठी काही ना काही बोलत राहतात. जोपर्यंत तिन्ही पक्षाचे नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत सरकार राहणार, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

महाविकास आघाडी सरकारला 18 महिने बोनसमध्ये मिळाले आहेत. आता लोकं झोपत असताना कधीही सरकार पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. 18 महिन्यांपुर्वी सरकार आल्यापासून कुठल्याही क्षणी जाईल यासाठी बॅग भरुन तयार असतानाही 18 महिने त्यांना सरकार मिळाले आहे. यामध्ये कोविड एक भाग आहे तसेच कदाचित त्यांचे नशीबही असेल.

देवेंद्र फडणवीस जसे म्हणतात की, दादा झोपेतून उठल्यावर सरकार गेले होते. इतक्या अचानक गेले.. केसाने गळा कापणे म्हणतात तसे.. तसेच आताही झोपेत असताना सरकार जाईल, चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील पत्रकारपरिषदेत म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी राजीनामा देतो, साताऱ्यात पुन्हा निवडणूक घ्या !

News Desk

मुंबई महानगरपालिकेचे आज बजेट सादर होणार

News Desk

भाजपच्या  घोटाळेबाज मंत्र्यांना शिवसेनेने केले लक्ष 

News Desk