HW News Marathi
महाराष्ट्र

“चंद्रकांतदादा म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी”, अजित पवारांनी लगावला टोला

कोल्हापूर | राज्याच्या जीएसटीची थकलेली रक्कम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण पंतप्रधान नरेंद्री मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. यावेळी अजित पवारांनी जीएसटीची थकलेली रक्कम २४ हजार ३०६ कोटी द्यावेत अशी मागणी केली होती. याच जीएसटीच्या रकमेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांची अवस्था विनाशकाले विपरीत बुद्धी अशी झाल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार आज (१४ जून) कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. चंद्रकांतदादांना जीएसटीची खरी आकडेवारी माहीत नाही. दुर्देवाने ते मंत्रिमंडळात नाहीत. त्यामुळे त्यांना आकडेवारीची वस्तुस्थिती माहीत नाही. केंद्राकडून महाराष्ट्राला जीएसटीचे 24 हजार कोटी येणे बाकी आहे. आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे आमच्याकडे ऑफिशियल आकडे आहेत. ते आकडे आम्हाला माहीत आहे. आम्ही पंतप्रधानांना भेटलो तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सहीचं मागण्यांचं पत्रंच त्यांना दिलं आहे. त्यातही हा आकडा दिला आहे. काही लोकांना काही माहीत नसतं. काहीही बोलायची सवय असते. आपल्याकडे विनाशकाले विपरीत बुद्धी अशी एक म्हण आहे. काही लोकांची अवस्था अशीच झाली आहे, असा टोला पवार यांनी चंद्रकांतदादांना लगावला.

कोल्हापूरात निर्बंध लादण्यात हौस नाही, थोडं सोसा – अजित पवार

कोल्हापुरात निर्बंध कमी करण्याचा अजिबात विचार नाही, उलट ते अधिक कडक केले जातील. आम्हाला निर्बंध लादण्यात हौस नाही, थोडं सोसा. उलट कोरोनाचा संसर्ग वाढला तर कोल्हापुरात निर्बंध अधिक कडक करणार. बऱ्याच लोकांच्या तोंडावर मास्क नाही, रुमाल लावतात, पोलीस आले की रुमाल वर करतात. असं करु नका, तुम्हाला कोरोना झाला की बाकीच्या निष्पाप लोकांना त्याचा फटका बसतो. निर्बंध कडक अंमलबजावणी व्हायला हवी, असं सांगतानाच कोल्हापुरातील 12 जिल्ह्यात जिथे लसीकरण झालंय, तिथे पॉझिटिव्हिटी रेट थोडा कमी आहे. त्यामुळे लसीकरणावर भर असेल. जशी लस उपलब्ध होईल, तशी ती उपलब्ध करुन दिली जाईल, असं ते म्हणाले.

जसा तुम्ही राजीनामा घेऊन फिरत होतात तसा…

तसेच, यावेळीही चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधण्यात संधी सोडली नाही. चंद्रकांत पाटील म्हणाले की, १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस मोफत आहे. मग त्यासाठी ६ हजार कोटींचा चेक खिशात घेऊन फिरत होतात जसा राजीनामा घेऊन फिरत होतात तसा तो चेक घेऊन फिरत होतात. आता लस तर फ्री आहे. आणि आता मराठा समाजाला ३००० कोटी हवे आहेत. मग त्या ६ हजार कोटींचे करणार काय? कोणाला देणार? दादा ऑन स्पॉट निर्णय करतात, मग करा, असं चॅलेंजही यावेळी अजित पवारांना त्यांनी दिलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या औद्योगिक शहराची नगरपरिषद दत्तक, नितीन गडकरींनी उचललं पाऊल

News Desk

सांगोल्यातील उद्योजकाच्या घरातून दीड कोटींचा गांजा जप्त, गांजासोबत 25 लाखांचा रोकडही हस्तगत

News Desk

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, योगी आदित्यनाथ यांच्याबाबत साक्षीदाराने केला गौप्यस्फोट

Aprna