HW News Marathi
महाराष्ट्र

मला पाडून दाखवा ,अजित पवारांचं मुनगंटीवारांना चॅलेंज !

मुंबई | राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक विरूद्ध सत्ताधारी असा थेट सामना पाहायला मिळत आहे.आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार विरूद्ध सुधीर मुनगंटीवार यांच्यात खडाजंगी रंगली. माझ्या भाषणात जो अडथळा आणतो, तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही, असा इशारा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळातच दिला. त्यानंतर मुनगंटीवारांचं चॅलेंज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारलं. तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा, असं खुलं चॅलेंजचं अजितदादांनी दिलं. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं.

सभागृहात नेमंक काय झालं ?

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुरवणी मागण्या, हक्कभंग प्रस्ताव अशा विविध मुद्द्यावरुन अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकासआघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विमानतळापेक्षा एसटी महत्त्वाची आहे, मुख्यमंत्री कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पैसे दिले, पण आमदारांच्या वाहनचालकांना दिले नाहीत. दिव्यांगांचे पैसे दिले नाहीत, असे दावे मुनगंटीवार करत होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुनगंटीवारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर “माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही” असा फटकारा मुनगंटीवारांनी मारला. त्यावर अजित पवारांनीही तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांना थेट मोठ चॅलेंज केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवरात्रोत्सवानिमित्ताने “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबवण्याची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Aprna

वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची यशोगाथा

News Desk

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रभावी उपाययोजना राबविणार! – अब्दुल सत्तार

Aprna