HW News Marathi
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नाताळच्या शुभेच्छा

मुंबई | भगवान येशू ख्रिस्तांनी जगाला दया, क्षमा, शांती, परोपकाराचा संदेश दिला. संपूर्ण जीवन मानवतेच्या कल्याणासाठी काम केलं. भगवान येशूंच्या जन्मदिनानिमित्तानं साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समाधान, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो.

समाजात एकता, बंधुता, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार शुभेच्छा संदेशात म्हणतात की, वर्षअखेरीस येणारा नाताळचा सण सर्वत्र आनंद, चैतन्य, उत्साहाचं वातावरण घेऊन येतो.

छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देणारा नाताळ यंदाही उत्साहात साजरा करायचा आहे, परंतु सण साजरा करताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं व सुरक्षिततेचं पालन केलं पाहिजे. स्वत:चं, कुटुंबाचं, समाजाचं कोरोनापासून संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे, ती पार पाडूया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमची सत्ता आली तर मोहन भागवत यांना तुरुंगात टाकू !

News Desk

राजस्थानच्या घडामोडींनंतर महाराष्ट्र सरकारही अलर्ट, शरद पवार, बाळासाहेब थोरात यांनी रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

वैभववाडीत भाजपला खिंडार, ७ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार

News Desk