मुंबई | ‘उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका’, हा जगण्याचा आणि जिंकण्याचा मूलमंत्र स्वामी विवेकानंदानी आपल्याला दिला, तोच मूलमंत्र आजच्या युवकांनी अंगिकारावा, तीच स्वामी विवेकानंदांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करुन ‘राष्ट्रीय युवक दिना’च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, स्वामी विवेकानंदांनी आपल्या तेजस्वी विचारांनी, ओघवत्या वक्तृत्वाने आणि राष्ट्रप्रेमाच्या ऊर्जेने जगभरातल्या युवकांना कायमच प्रेरणा दिली.
जगभरातील युवकांना जगण्याचा आणि जिंकण्याचा मूलमंत्र स्वामी विवेकानंदांनी दिला. आपण दुर्बल आहोत, हा विचार पहिल्यांदा प्रत्येकाने आपल्या मनातून काढून टाकावा. जीवन जगताना कोणतेही एक ध्येय मनाशी बाळगावे, त्याचा आयुष्यभर ध्यास धरावा, तो विचार पूर्ण करण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावावी, ही शिकवण स्वामी विवेकानंदांनी आपल्याला दिली. राष्ट्राला बलशाली बनविण्यासाठी, त्यांच्या शिकवणीनुसार सर्व युवकांनी संघटीतपणे काम करावे, हीच स्वामी विवेकानंदांना खरी आदरांजली ठरेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
आपल्या तेजस्वी विचारांनी, ओघवत्या वक्तृत्वानं जगभरातल्या तरुणांना जगण्याचा आणि जिंकण्याचा मूलमंत्र देणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! सर्वांना 'राष्ट्रीय युवक दिना'च्या शुभेच्छा!
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 12, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.