मुंबई | अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादकआणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आज (४ नोव्हेंबर) अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईचे आभार मानले आहेत. तसेच गेले दोन अडीच वर्ष त्यांनी किती संघर्ष केला याबद्दल देखील भाष्य केले आहे.
“गाडीवर दोन बाटल्या फेकून मारल्या, तर त्रास होतो. माझ्या घरातील दोन प्रियजन गेले आहेत. नववीत असताना मी अन्वय नाईक यांच्या प्रेमात पडले, वयाच्या चौदाव्या वर्षी. माझा जीव तुटणार नाही का? आज करवाचौथ आहे, हे (गोस्वामींची अटक) त्याचंच फळ आहे” अशा भावना अक्षता नाईक यांनी बोलून दाखवल्या आहेत.
तीन लोकांची नावं माझ्या नवऱ्यानं सुसाईड नोटमध्ये लिहिलेली होती. एआरजी आउट लायर शेवटचा प्रोजेक्ट होता. पण, फक्त अर्णब गोस्वामीमुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत. ती जर मिळाली असती, तर माझा नवरा आज जिवंत असता. अर्णब गोस्वामी हा व्हायरस आहे. अर्णब गोस्वामीसारख्या माणसांची ही मानसिकता आहे. जे कामं करून घेतात आणि पैसे देत नाहीत. माझ्या मते कोणत्याही नागरिकाने याला न्याय देऊ नये. आम्ही सुशांत सिंह राजपूत नाही,” तसेच, रिपब्लिक टिव्ही बंद व्हायला हवा. माझ्या नवऱ्याने जी वास्तू बांधली ती बंद झाली पाहिजे अशी मागणी देखील अक्षता नाईक यांनी केली.
“अर्णब गोस्वामी हे माझ्या वडिलांना वारंवार धमक्या देत होते. पैसै तुला मिळणारच नाही. जे मिळालेत ते पण मी कसे वसूल करतो, हे मी बघून घेईन. त्यावेळी यावरून आमची चर्चाही झाली होती की, पोलिसांत तक्रार करू. पण त्यांना मुलीचं करिअरही उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली होती. सातत्यानं त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. आमच्या इतर ग्राहकांनाही अर्णब गोस्वामी यांनी पैसे न देण्यास सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे पर्यायच उरला नव्हता,” अशी माहिती नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
“सूडबुद्धीनं त्यांनी हे केले. त्यांनी रडवून रडवूनही स्टुडिओच्या कामाचं बजेट कमी केलं. पण, तेही पैसे दिले नाहीत. ८३ लाख रुपये खर्च स्टुडिओवर करण्यात आला आहे. यापैकी काहीही पैसे देण्यात आले नाही. त्यांचं हे शेवटचं प्रॉजेक्ट होतं. मार्केटमध्ये दुसरी कामं घेण्यासाठी पैसे नव्हते,” असा आरोप नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.