HW News Marathi
Covid-19

फडणवीसांपासून-खडसेंपर्यंत भाजपच्या नेत्यांचे राज्य सरकारविरोधात ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन

मुंबई | कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यास राज्य सरकार अपयश ठरल्यामुळे भाजपने त्यांच्याविरोधात आज (२२ मे) “मेरा आंगण, मेरा रणांगण” असे म्हणत महाराष्ट्र बचावचा नारा देत आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ५० हजार कोटी रूपयांच्या पॅकेजची मागणी त्यांनी केली.

या आंदोलनात राज्यभरातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी आपआपल्या घराच्या अंगणात, कार्यालयाबाहेर काळ्या फिती बांधून, ठाकरे सरकारविरोधातील घोषणांचे फलक हातात घेऊन उभे राहिले. आज भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले. आज सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत घराच्याबाहेर उभे राहून काळ्या फिती, काळे झेंडे, रिबन आणि फलक उंचावून सरकारचा निषेध नोंदवला गेला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकार विरोधात निषेध नोंदविला

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली दहिसर पूर्व येथे दरेकर पश्चिम द्रुतगती महामार्ग येथील संपर्क कार्यालयाबाहेर भाजपचे ‘मेरा आंगण मेरा रणांगण, महाराष्ट्र बचाव’ आंदोलन सुरु…काळ्या फिती, काळे मास्क व फलक घेऊन सुरु केले आंदोलन महाआघाडी सरकार जागे व्हा..भोंगळ कारभार बंद करा चा दिला नारा

जालना येथे भाजपच्या वतीने सरकार विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून मुंडन करत सरकारचा निषेध केला. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे आंदोलन केले. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सध्या कुठलीच निवडणूक नाही. मग आम्हाला याचा राजकीय फायदा कसा होईल, असेही म्हणत आंदोलन केले.

डावलेले नेत्यांनीही घेतला आंदोलनात सहभाग

राज्याली विधानसभा आणि विधानपरिषदेत डावलेल्या भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसचे यांनी ठाकरे सरकारविरोधात गेल्या काही दिवसांपूर्वी टीका केली होती. मात्र, राज्य सरकारवर टीका करण्यासाठी खडसेंनी जळगावातील मुक्ताईनगरात आपल्या घरासमोर अंगणात उतरुन, महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच माजी मंत्री विनोद तावडेंनी देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासबोत सरकारविरोधात आंदोलनात सहभागी झाले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची परवानगी द्या, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी

News Desk

आज १४७५ रुग्ण कोरोनामुक्त, राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ८० हजारांचा टप्पा

News Desk

राज्यात आज १५ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk