HW News Marathi
Covid-19

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर ‘या’नेत्यांची लागणार वर्णी !

मुंबई | महाराष्ट्रातील बहुचर्चित विधानपरिषदेची निवडणूक मुंबईमध्ये येत्या ९ मे रोजी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्राची विधानपरिषदेची निवडणूक ही २४ एप्रिल रोजी होणार होती. मात्र, देशासह राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहात ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला होता. मात्र, गेल्या महिन्याभरापासून राज्याचे जे राजकीय अस्थिरचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याची विनंती केली. यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही पक्षातील नेते मंजळींनी राज्यपालांची भेट घेतली. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवर चर्चा देखील झाली होती. या सर्व गोष्टी राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या आहेत. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री यांचा आमदार होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांनंतर आता सर्वा उत्सुकता लागली ती म्हणजे विधानपरिषदेच्या ९ जागेवर कोणत्या पक्षातून नेमके किती उमेदवार दिले जाणार आणि कोणत्या नेत्यांना पक्षाकडून तिकीट दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

विधानपरिषदेची एकूण २३८ आमदार आहेत. ते विधानपरिषदेच्या उमेदवारांसाठी मतदान करतात. विधानपरिषदेतील उमेदवारांना ३० ते २३ पसंतीचे मदत ही प्रत्येक उमेवाराला मिळणे आवश्यक आहे. सध्या पक्षांचे संख्याबळ पाहिले तर भाजपचे १०५ आमदार आणि १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपकडे ११५ जागाच्या जोरावर तीन आमदार तर सहज निवडून येईल. मात्र, भाजप त्यांचा चौथ्या आमदार देणार असून तोही निवडून येईल, असे मत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. तसेच चार उमेदवार निवडून आणून आमची दोन मते शिल्लक राहतील, असा आत्मविश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

विधानपरिषदेची निवडणू महाविकासआघाडी ६ जागासाठी लढणार आहे, असे मत राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. एका बाजुला अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक म्हमतात, महाविकासआघाडी पाच जागांवर निवडणूक लढणार आहे. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस २, काँग्रेस १ आणि शिवसेना २ जागावर निवडणूक लढवणार आहे. सध्या राज्यातील नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. विधीमंडळातील संख्या बळ पाहाता भाजप चार जागांवर उमेदवार दावा करण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर महाविकासआगाडी पाच जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे बोले जाते. मात्र, एका जागेसाठी काँग्रेसच्या इच्छेसाठी संघर्ष होणार का हे पाहणे निश्चित महत्त्वाचे आहे.

विधान परिषदेसंदर्भात राजकीय विश्लेषकांची मते

सध्याची परिस्थिती पाहाता राज्याची निवडणुका बिनविरोधी होण्याची सर्वांची इच्छा असेल. मात्र एका जागेसाठी संघर्ष करण्यापेक्षा एका सामान्य उमेदवाराला ही जागा देऊन त्याला आमदार करणे हा पर्यांय दोन्ही राजकीय पक्ष निवडणू शकतील, असे मत राजकीय विश्लेषक यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले. एका जागेसाठी राजकीय सत्तासंघर्ष होताना दिसत नाही, असे मत राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका या बिनविरोधात होण्याच शक्यता व्यक्त केली आहे.

विधानपरिषदेच्या ९ जागांवर नेमक्या कोणत्या नेत्यांची वर्णी

शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे या दोघांची नावे निश्चित केली आहे. काँग्रेस, भाजपकडून अनेक इच्छुक असल्याचे कळते. यामध्ये विधानसभेत ज्याचे तिकीट डावले, पराभूत झाले आणि ज्या आयारामाना पक्षात घेते, अशी भली मोठी यादी सध्या त्यांच्याकडे आहे. यात जेष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, अशी मंत्री आणि नुकतेच भाजपमध्ये आलेले अतुल भोसले, रणजिंतसिंग मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील सर्वांचा समावेश आहे. यासर्वांपैकी नक्की कोणाच्या नावाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपूर्वी एकनाथ खडसे म्हणाले, मला महाराष्ट्रच्या राजकारणात येईचे आहे, अशी इच्छा त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे बोलून देखील दाखवली आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानपरिषदेसंर्भात नेमका कोणता निर्णय घेतील राज्याचे लक्ष लागेल आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुक

विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकाची यादी खूप मोठी आहे. विधान परिषदेचे निवृत्त होणार आमदार हेमंत टकले, महेश तपासे, नजीब मुल्ला, आमोल मिटकरी रुपाली चाकणकर आणि शशिकांत शिंदे या सर्वांची नावे आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. शिशीकांत शिंदे यांनी २०१९ची विधानसभा निवडणूक कोरेगाव-भीमा येथून लढवली होती. मात्र, शशिकांत शिंदेंना पराभावाचा सामना करावा लागला आहे. शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे विधानसभेतील पराभव त्यांचे पुर्नवसन हे विधानपरिषदेत केले जाणार का?, हे पाहाणे महत्त्वाचे असणार आहे. शशिकांत शिंदे आणि शरद पवार यांचा जिवाळ्याचा एक क्षण म्हणज ज्यावेळी विधानसभेत शशिकांत शिंदेंचा पराभव झाला आणि त्यावेळी सातारा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील मोठ्या मताधिकांनी निवडून आले. श्रीनिवास पाटील यांच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी शरद पवार साताऱ्यात येणार होते. मात्र, शशिकांत शिंदे यांच्या पराभवाचा फार मोठा धक्का त्यांना बसला होता. त्यामुळे शरद पवार यांनी साताऱ्याला जाणे टाळले. यानंतर श्रीनिवास पाटील यांनी बारामती येऊन शरद पवारांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शशिकांत शिंदेंच्या पराभव झाला त्यामुळे मी साताऱ्याला जाणे टाळले. यावरून शरद पवार आणि शशिकांत शिंदे यांचे नाते खट असल्याचे दिसून आले.

मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता | शशिकांत शिंदे

विधानपरिषदेवर राष्ट्रवादीकडून इच्छुक आहात का असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता, मला संधी मिळाली तर आजवर लोकांसाठी काम केले. तसेच काम करेन. शेवटी विधानपरिषदेवर संधी कोणाला द्यायची हा निर्णय पक्षश्रेष्ठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेतात. पण संधी मिळाली तर लोकांची सेवा करेन, असे शशिकांत शिंदे यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले.

Related posts

यंदा पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी नाही !

News Desk

महाराष्ट्रासाठी पुढील ८ दिवस महत्वाचे, राजेंद्र शिंगणेंनी व्यक्त केली चिंता

News Desk

नव्या वर्षाचं नागरिकांना गिफ्ट,  WHOकडून  फायझरच्या लसीला मान्यता

News Desk