HW News Marathi
Covid-19

धनंजय मुंडेंच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी होम क्वारंटाईन राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

मुंबई | राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे त्यांच्यासह त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक अशा पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. धनंजय मुंडे यांना कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यानंतर धनंजय मुंडे यांच्या संपर्कात असलेल्या सर्वांनी होम क्वारंटाईन होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश दिले आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे दिसत असेल तर त्यांनी त्वरित कोरोनाची चाचणी करून घ्या, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगतले आहे.

विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी ८ जून रोजी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत पहिल्या कोरोना विषाणू थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण देखील केले होते. या लोकार्पम सोहळ्यात अनेक जण उपस्थित होते. तसेच धनंजय मुंडे यांनी १० जून रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला ही त्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आले होते. वर्धापन दिन आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क आल्याने ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसमोर ‘धारावी पॅटर्न’ही फेल?”, मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाचं विधान

News Desk

महावीर जयंती, हनुमान जयंती, ‘शब्ब-ए-बारात’साठी घराबाहेर पडू नका, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

Arati More