HW News Marathi
महाराष्ट्र

मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत, विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे केले वाटप

बेलगाव | बेलगाव येथील वानखेडे कुटुंबात कन्यारत्न जन्माला आहे. चंद्रकांत आत्माराम वानखेडे यांच्या घरी मुलगीचा जन्म झाला. चंद्रकांत वानखेडे यांचे हे पहिलेच अपत्य आणि त्यातही मुलगी जन्माला आल्याने त्यांनी प्रचंड उत्साहात लेकीच्या जन्माचे स्वागत करण्यात केले. गावात ढोल ताशांच्या गजरात जिलेबी वाटून त्यांनी मुलीच्या जन्माचे स्वागत केले. शिवाय जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून बेटी बचाओ, बेटी पढाओ चा संदेश दिला.

शासन तसेच सामाजिक चळवळीतून मुलींची दिवसेंदिवस घटणारी संख्या पाहता व्यापक स्वरूपाचे उपाय करण्याचे आवाहन करण्यात येत असतात. विशेषत: सार्वजनिक सण, उत्सवात पुढाकार घेऊन संदेश देण्यात येतात. अशातच प्रत्यक्षरीत्या कृतीतून मुलींच्या जन्माचे स्वागत करत जल्लोष करण्याचा प्रत्यय बेलगाव येथे वानखेडे कुटुंबीयांनी केला. या कुटुंबात मुलीचा जन्म झाल्याने त्यांनी स्त्रीजन्माचे स्वागत करण्यासाठी ढोल ताशांच्या निनादात गावात जिलेबी वाटून आनंद साजरा केला.

गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती अ‍ॅड. सुरेशराव वानखेडे होते. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गजानन सावंत, निसार अन्सारी, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप देशमुख, यासीन बेग, बेलगावचे माजी सरपंच भागवत वानखेडे, ज्ञानेश्वर माऊली वानखेडे, आत्माराम वानखेडे, गजानन वानखेडे, ओम वानखेडे, गजानन खडसे, अनिल वानखेडे, रितेश वानखेडे, सुरेश जाधव, अनिल वानखेडे, गजानन देशमुख, जीवन वानखेडे व गावातील नागरिक व मित्र मंडळी हे उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, शंंभर टक्के मंत्री होणार !

News Desk

कुख्यात गुंड गजानन मारणेला सातारा जिल्हयात अटक…

News Desk

विराट-अनुष्काला ‘कन्यारत्न’!

News Desk