HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर मनसेपुढे ॲमेझाॅनची माघार, मराठी भाषेचा समावेश लवकरच करणार  

मुंबई | ‘मराठी नाही तर ॲमेझाॅन नाही’ असे ठणकावत ॲमेझाॅनवर मराठी भाषेचा अंतर्भाव करण्यासाठी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काल (२५ डिसेंबर) या मागणीवरून मनसैनिकांनी पुण्यात ॲमेझाॅनचं कार्यालय व वेअरहाऊसवर धडक देत तोडफोड केली होती. त्यामुळे ॲमेझाॅनने हा विषय अधिक न वाढवता मनसेची मागणी मान्य करण्याची भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. अॅमेझॉनची वेबसाइट व मोबाइल ॲपवर येत्या सात दिवसांत मराठी झळकणार असून तसे आश्वासन ॲमेझाॅनने दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, मनसे नेत्यांकडून ॲमेझाॅनने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही माफी मागायला हवी, अशी मागणी केली आहे.

मराठीवरून मनसे आणि ॲमेझाॅनमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. ॲमेझाॅनवर इतर भाषांप्रमाणे मराठी भाषेलाही स्थान असायला हवे, अशी मागणी मनसेने केली आहे. त्यातूनच ‘नो मराठी, नो ॲमेझाॅन’, असे फलकही मुंबईत सर्वत्र लावत मनसेने जोरदार मोहीमही सुरु केली होती. दुसरीकडे ॲमेझाॅनच्या अनेक फलकांनाही मनसेने लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर ॲमेझाॅनने मनसे विरुद्ध मुंबईतील दिंडोशी येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. ॲमेझाॅनच्या याचिकेवरून न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

ॲमेझाॅनच्या कामात मनसेने कोणताही अडथळा आणू नये. मनसेवर अॅमेझॉनने जे आरोप केले आहेत त्यावर १३ जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर द्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. राज यांनी ५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहावे, असेही नमूद करण्यात आले आहे. गुरुवारी या नोटिसा बजावण्यात आल्या असताना काल याचे पडसाद पाहायला मिळाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषी कायद्याच्या विरोधातील यापुढील आंदोलने दिल्लीत होणार, राजू शेट्टींचा इशारा

News Desk

संजय राठोडांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाचे राज्यभर ‘चक्काजाम’ आंदोलन

News Desk

राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांच्यावर केलेल्या आरोपावर अजित पवार म्हणाले…

News Desk