HW News Marathi
Covid-19

मनसेचे नेते अमित राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरेंना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. २ दिवसांपासून ताप आणि खोकला असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली असता कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

अमित ठाकरे कोरोना पॉझिटिव्हट असल्याची माहिती मिळताच राजकीय वर्तुळातून त्यांना प्रकृतीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत लवकरात लवकर बरे व्हा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, राज्यात सामान्य नागरिकांसोबत नेत्यांनाही आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण होण्याने प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाची लागण होती. एकंदरीत राज्यात कोरोनाची स्थिती भयानक होत चालली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची दुसरी लाट ओळखताना उशीर झाला, पण महाराष्ट्रात तिसरी लाट येऊ द्यायची नाही – उद्धव ठाकरे

News Desk

नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क न लावण्याचा विचारही करू नये !

News Desk

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना कोरोनाची लागण

Aprna