HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर

सिंधुदुर्ग | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज(७ फेब्रुवारी) एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. खासदार नारायण राणे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयचं ते उद्घाटन करणार आहेत. सिंधुदुर्गात अमित शाह यांची उपस्थिती भाजपसाठी महत्त्वाची ठरणार आहे. एक तर अमित शाह यांच्या उपस्थितीमुळे नारायण राणे यांचे पक्षातील वजन वाढणार आहे.

तसेच, सिंधुदुर्गात भाजपला बळकटी देत शिवसेनेला शह देण्याचा भाजप नेतृत्वाचा प्रयत्न असणार आहे. या दौऱ्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्याच्या घडामोडींबद्दल काय वक्तव्य करतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

या आधी बोलताना नारायण राणे यांनी अमित शाह यांच्या दौऱ्याबाबत बोलताना म्हटलं होतं की, अमित शाह यांच्या पायगुणाने राज्यातील सरकार जावं. सिंधुदुर्ग कुडाळ येथे आज लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन होणार आहे. त्याआधी नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत हे वक्तव्य केलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठवाड्यात राष्ट्रवादीची उद्यापासून हल्लाबोल यात्रा

swarit

महाविकास आघाडीकडून फडणवीस सरकारच्या वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश

News Desk

नांदेडमधील होल्ला मोहल्ला कार्यक्रमात तुफान राडा, पोलिसांच्या गाड्या फोडल्या!

News Desk