HW News Marathi
Covid-19

अमित शाह श्वसनाच्या त्रासामुळे पुन्हा ‘एम्स’मध्ये दाखल 

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित शाह यांना शनिवारी (१२ सप्टेंबर) रात्री ११ वाजण्याचा सुमारास दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या एक तज्ञ डॉक्टरांची एक टीम अमित शहांच्या प्रकृतीची तपासणी आणि त्यांच्यावर उपचार करत आहे. दरम्यान, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
खरंतर अमित शाह यांना नुकताच ३१ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज मिळाला होता. थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत असल्याने शाहांना ‘एम्स’मध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले होते. कोरोना होऊन गेल्यानंतरची लक्षणे दिसत असल्याने अमित शाह यांना १८ ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. तर त्यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी कोरोनामुक्त होऊन घरी आल्यानंतर अमित शहांनी स्वतः ट्विट करून सांगितले होते. मात्र, आता पुन्हा त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किराणा मालाची दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरु राहणार! सरकारचा मोठा निर्णय

News Desk

जळगावात कोविड रुग्णालयात शिरले पावसाचे पाणी, रुग्णांचे झाले प्रचंड हाल

News Desk

राज्यात आज ७८८३ रुग्ण झाले कोरोनामुक्त

News Desk