HW News Marathi
महाराष्ट्र

मनसे नेते अमित ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती थोडी खालावली असल्याने केवळ खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. तर, घाबरण्याचं कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसेच, एक-दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळेल, असं देखील सूत्रांच्या आधारे एबीपी माझाने वृत्त दिले आहे.

अमित ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आहे. शिवाय, मलेरिया टेस्ट देखील निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.लिलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर अमित ठाकरे यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आला आहे. तसेच मलेरिया आणि इतर चाचण्याही निगेटिव्ह आल्या आहेत. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की, हा ताप व्हायरल असण्याची शक्यता आहे. परंतु, सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुढील एक दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोपीनाथ मुंडेंच्या संस्थेकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष

News Desk

‘रायगडात भूस्खलनामुळे सात जणांचा बळी,’ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण!

News Desk

राज्यभरात १६ नोव्हेंबरपासून ‘मराठा संवाद यात्रा’

Gauri Tilekar