मुंबई | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे नानावटी रुग्णालयात गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. आणि आता त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिनेता अभिषेक बच्चन यांनी ट्विट करत याबाबतची माहिती केली.
🙏🏽 my father, thankfully, has tested negative on his latest Covid-19 test and has been discharged from the hospital. He will now be at home and rest. Thank you all for all your prayers and wishes for him. 🙏🏽
— Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 (@juniorbachchan) August 2, 2020
“माझ्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ते घरी आराम करत आहेत,” असे ट्विट अभिषेक बच्चन यांनी केले आहेत. मात्र माझ्या शरीरात कोरोनाचे काही विषाणू शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मी लवकरच कोरोनाला हरवून घरी परत येईल,” असे ट्विट अभिषेक बच्चन यांनी केले आहे.
I, Unfortunately due to some comorbidities remain Covid-19 positive and remain in hospital. Again, thank you all for your continued wishes and prayers for my family. Very humbled and indebted. 🙏🏽
I’ll beat this and come back healthier! Promise. 💪🏽— Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 (@juniorbachchan) August 2, 2020
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ११ जुलैला रात्री उशिरा समोर आली होती. त्यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. दोघांना कोरोनाची सौम्य लक्षणे होती. त्यामुळे त्यांना ११ जुलैला मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सून आणि नात ऐश्वर्या आणि आराध्या यांनाही लागण झाली होती. त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्या दोघींना देखील डिस्चार्ज देण्यात आला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.