HW News Marathi
Covid-19

जाणून घ्या…राज्य सरकारची खासगी कार्यालय अन् दुकानांसाठी नवीन नियमावली

मुंबई। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारच्या ‘मिशन बिगीन अगेन’ची घोषणा केली. या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनचा पाचवा टप्पा फक्त कटेंनमेंट झोनपुरताच मर्यादित असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात ३ जूनपासून या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात येणार होती. यासंदर्भातील नियामावली राज्य सरकारकडून आज (४ जून) जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील दुकाने ही सम-विषमनुसार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रस्त्याच्या एका बाजूची दुकाने एक दिवशी तर दुसऱ्या बाजूची दुकान एक दिवशी उघडण्यात परवानगी देण्यात आली आहे. या दुकानांवर पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची नजर असणार आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे, असेही ज्या सरकारच्या नवीन नियमावलीमध्ये म्हणाले आहे.

खासगी कार्यालयांनाही या नियमावलीत सूट देण्यात आली आहे. खासगी कार्यालये १० टक्के किंवा १० कर्मचारी घेऊन काम सुरु करु शकतात. उरलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागणार आहे. येत्या ८जूनपासून हा निर्णय लागू होणार आहे.

राज्यातील खाजगी ऑफिसेस सुरु करण्यासाठीचे नियम

१. १०% कर्मचाऱ्यांसह खासगी ऑफिसेस सुरु करण्यास परवानगी

२. उर्वरित कर्मचारी वर्क फ्रॉम होम करणार

३. ऑफिसमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टंसिंगसह सर्व नियम पाळावे लागणार

४. ऑफिसेसकडून कर्मचाऱ्यांना सॅनिटायझेशनच्या योग्य पद्धतीबाबत माहिती

५. कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी

राज्यातील दुकाने सुरु करण्यासाठीचे नियम

१. राज्यातील दुकाने सुरु ठेवण्यासाठी सरकारचा सम-विषमाचा फॉर्म्युला

२. एका दिवशी रस्त्याच्या एकाच बाजूची दुकाने सुरु राहणार

३. महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांचे नियंत्रण राहणार

४. व्यवहार सुरळीत राहण्यासाठी बाजार/दुकानदारांच्या संघटनांशी समन्वय राखणार

५. सोशल डिस्टंसिंग आणि ट्रॅफिकचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावे लागणार

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१७ मेनंतर काय ? सोनिया गांधींचा सवाल

News Desk

देशात 38 हजार 792 नवे रुग्ण आढळले

News Desk

राज्यात ‘ॲण्टीजेन’ पाठोपाठ ‘अँटी बॉडीज्’ चाचण्या करण्याचा निर्णय !

News Desk