HW News Marathi
महाराष्ट्र

RSS चे सरसंघचालकांना कोरोना झाल्यावर अमोल मिटकरी म्हणतात,”आता भिडे गुरुजींना विचारा”

मुंबई | देशात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. सामान्य नागरिकांसह नेत्यांनाही कोरोना होण्याचे प्रमाण वाढत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडेंची फिरकी घेतली आहे. मोहन भागवत यांना कोरोना झाल्याच्या बातमीवर अमोल मिटकरी यांनी ट्विट केले आहे. अमोल मिटकरी यांनी आता भिडे गुरुजींची प्रतिक्रिया घ्या, असं ट्विट केलं आहे.

काय आहे अमोल मिटकरींचे ट्विट?

संभाजी भिडे यांनी कोरोनावर जे वक्तव्य केलं होतं त्यावरुन अमोल मिटकरी यांनी निशाणा साधत मोहन भाजवत यांना कोरोना झाला आहे त्याबाबत पत्रकारांनी भिडे गुरुजींची प्रतिक्रिया एकदा घ्यावी!!, असे खोचक ट्विट केले आहे.

काय म्हणाले होते संभाजी भिडे?

कोरोना आणि मास्कबद्दल संभाजी भिडे यांनी नुकतंच वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कोरोना हा ## वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. इतकंच नाही तर “कोरोना हा रोग नाही आणि कोरोनाने माणसं मरतात ती जगायला लायक नाहीत. दारुची दुकाने उघडी त्याला परवानगी आणि कुठं काय विकत बसला आहे त्याला पोलीस लाठी मारतात. काय ## पणा चाललाय? हा ##पणा आहे. लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असलं हे शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही. मी काही राजकीय माणूस नाही, माझ्यासारखी असंख्य लोक अस्वस्थ आहेत संपूर्ण देशात. कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे”, असंही संभाजी भिडे म्हणाले होते.

मोहन भागवत यांना कोरोना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना नागपूरच्या किंग्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

 

तर आजच्या सामना अग्रलेखातूनही संभाजी भिडे यांच्या त्या वक्तव्याचा आधार घेत राऊतांनी भाजपला लसीच्या राजकारणावरुन सुनावले आहे.कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात, मुंबईत लसीचा ठणठणाट आहे व पंतप्रधानांनी ‘लस उत्सव’ साजरा करण्याचे फर्मान सोडले. पंतप्रधानांचा ‘लस उत्सव’ साजरा करण्यासाठी तरी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीत जाऊन एक कोटी लसींचे पार्सल घेऊन यावे. राजकीय भांडणे आहेत, पण त्या भांडणात आपल्याच लोकांचे जीव का घ्यायचे? महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेने कधीतरी आजच्या विरोधी पक्षालाही सत्तेवर बसवलेच होते. तेवढे तरी इमान राखा. ‘लस’ जनतेसाठी आहे. फालतूच्या राजकारणासाठी नाही. जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘##’च म्हणावे लागेल.

कोरोना या विषाणूने हाहाकार माजवला आहेच, पण त्यामागचे राजकारण हे जणू तांडवच करू लागले आहे. माणसे सरणावर चढत आहेत व त्यांच्या मढय़ांवरून वादावादी सुरू आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात हे असे कधीच घडले नव्हते. कोरोना हा मानवनिर्मित की दैवी कोप? यावर बरेच वाद झाले, पण सांगलीचे शिवभक्त अवलिया भिडे गुरुजी यांनी वेगळाच सिद्धांत मांडला आहे. ‘जे ‘##’ आहेत त्यांना कोरोना होणारच. कोरोनामुळे जे मरणार आहेत ती माणसे जगायच्याच लायकीची नाहीत,’ असा विचार सांगलीच्या या अवलियाने मांडल्यामुळे बहुधा लसनिर्मिती करणाऱया कंपन्यांनी स्वतःचे उद्योग गुंडाळायला घेतले असतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेळघाटात कुपोषणमुक्तीसाठी ‘मिशन २८’ ठरले प्रभावी

Aprna

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’वर उदयनराजे भोसले आज भूमिका मांडणार

News Desk

चंद्रपूर विमानतळ कामाची गती वाढवावी! – सुधीर मुनगंटीवार

Aprna