HW News Marathi
देश / विदेश

महिला सुरक्षेसाठी सरकारने कठोर कारवाई आणि कायदे करण्याची गरज !

नवी दिल्ली | हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून महिला प्राध्यपिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे.. या पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेचे पडसात काल (५ फेब्रुवारी) लोकसभेत देखील पाहायला मिळाले. अमरावतीची खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत हिंगणघाट पीडितेची बाजू मांडत महिला सुरक्षेचा प्रश्न चिन्हा उपस्थित केली.

नवनीत राणा लोकसभेत म्हणाले की, “महिला सुरक्षेसाठी सरकारने कठोर कारवाई आणि कायदे करण्याची गरज असल्याची त्या लोकसभेत म्हणाल्या. आपण नेहमी बेटी बचाओ बेटी पढाओ असे नारा देतो, पण जर महिलांवरी अत्याचाराच्या घटना वाढत राहिल्या, तर महिला ना, कॉलेज ना, नोकरीवर जावू शकत नाही.तर महिला घराबाहेर पडू शकणार नाही. या महिलांवरच्या अत्याचाराच्या प्रकरणांवर तातडीने न्याय होत नाही. फक्त ‘तारीख पे तारीख’ असे सुरु असते, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

पीडित तरुणींला मुख्यमंत्री वैद्यकीय निधीतून मदत

या पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज देत आहे. पीडित तरुणी ४० टक्के भाजली होती. तिच्यावर सध्या नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पीडित तरुणीला उपचारांचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पीडित तरुणीला वाचविण्यासाठी सर्वोतपरी मतद करण्याचे आश्वास मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसेच पीडित मुलीच्या उपचारासाठी विख्यात नॅशनल बर्न्स स्पेशलिस्ट डॉ. केसवानी त्यांच्या टीम नागपूरला काल ( ४ फेब्रुवारी) सायंकाळी ६ वाजता रवाना होणार आहे. पीडित मुलीच्या उपचारासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ

Aprna

मोदी नोकरशाहीला बाजूला सारून निर्णय घेत आहेत | रघुराम राजन

News Desk

एअर स्ट्राईकदरम्यान दहशतवादी तळांवर ३०० मोबाईल अ‍ॅक्टिव्ह, गुप्तचर यंत्रणांची माहिती

News Desk