मुंबई । माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आपल्या तडफदार स्वभावासाठी ओळखल्या जातात. शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकंदर ठाकरे सरकारवर बोचऱ्या टीका करत अमृता फडणवीस वेळोवेळी व्यक्त होत असतात. आता मात्र अमृता फडणवीस या एका ट्विटर युजरच्या वादग्रस्त टिप्पणीवर संतापल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी आता अमृता फडणवीस यांनी थेट मुंबई पोलिसांची मदत मागितली आहे.
Audacity of #MVA workers-Objectifying independent women who have put in years of dedicated service & maligning their character by linking them to men.This is not just one tweet but many such tweets are being posted-@CPMumbaiPolice hope u r not under their pressure-pls take action https://t.co/cA4BRpQJwB
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 27, 2021
युजरच्या आक्षेपार्ह भाषेवर अमृता फडणवीस संतप्त प्रतिक्रिया देत आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, “हा बघा महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांचा उद्धटपणा. स्वत:च्या पायांवर उभे असलेल्या आणि एखाद्या संस्थेत अनेक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या महिलेला लक्ष्य केले जाते. पुरुषांशी तुलना करुन तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो. अशी अनेक ट्विटस केली जातात. मुंबई पोलिसांनी याविरोधात कारवाई करावी. तुम्ही कोणत्याही दबावाखाली नसाल, अशी अपेक्षा आहे.”
संबंधित युजरने अमृता फडणवीस यांच्या अॅक्सिस बँकेतील नोकरीवर टिप्पणी करणारे वादग्रस्त ट्विट केले. “मित्रांनो अॅक्सिस बँकेत चांगलाच स्कोप आहे. तुम्ही कॅशियर म्हणून जॉईन करुन थेट बँकेचे मॅनेजर अगदी उपाध्यक्ष होऊ शकता”, असे म्हणत या युजरने आपल्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांचा फोटो जोडत आक्षेपार्ह टिपण्णी केली आहे. या ट्विटनंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन अत्यंत संतप्त अशी प्रतिक्रिया दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.