HW News Marathi
महाराष्ट्र

‘तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है ,देखें अबके किसका नंबर आता है’ मिसेस फडणवीसांचे सूचक ट्विट

मुंबई | कायम अनेक विषयावर आपले मत मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा एक सूचक ट्विट केले आहे. मुंबईत सोमवारी पहाटेपासून तौक्ते चक्रीवादळाचा मोठा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी ट्विट केले.

काय आहे अमृता फडणवीस यांचे ट्विट?

‘तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है ,देखें अबके किसका नंबर आता है !’, असा मजकूर या ट्विटमध्ये आहे. आता अमृता फडणवीस यांना या माध्यमातून आणखी एका राजकीय वादळाविषयी सूचित करायेच आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच या राजकीय वादळाचा फटका कोणाला बसणार, महाराष्ट्रातील राजकारणावर, सरकारवर त्याचे काय परिणाम होणार, असे अनेक प्रश्न अमृता फडणवीस यांच्या या ट्विटमुळे उपस्थित झाले आहेत.

क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?’

काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. “पहचान कौन? एक राजा जो- महल की चौखट से निकलता नही अवाम से कभी मिलता नही सत्य और कर्म की राह पर चलता नही वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही महामारी का कहर उससे संभलता नही प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही ! सच है, धोखा कभी फलता नही। क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?”, असं ट्विट अमृता यांनी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत मांडणार

News Desk

रामदेवबाबा, अनिल अंबानींना दिलेल्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार !- नाना पटोले

News Desk

नाताळचा सण समाजात एकता, बंधुता, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो! – अजित पवार

Aprna