HW News Marathi
महाराष्ट्र

रोहित पवारांच्या ‘त्या’ ट्विटवर अमृता फडणवीस म्हणतात…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचे ट्विट करुन कौतुक केले होते. या ट्विटला आता अमृता फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. धन्यवाद रोहित भाऊ, असे म्हणत अमृता फडणवीसांना रोहित पवारांचे आभार मानले आहेत. दरम्यान, या आधीही अनेक गाणी ही अमृता फडणवीसांची त्यांच्या प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आणि लोकांच्या पसंतीस उतरली होती.

 

काल (८ मार्च) जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे ऐकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांना मिळालेल्या संधीचा योग्य फायदा उठवला, असे रोहित पवार यांनी म्हटले होते. ‘काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!’ , असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’, अमृता फडणवीसांचे नवे गाणे प्रदर्शित

गेल्या अनेक दिवसांपासून नेटकऱ्यांना उत्सुकता असलेले अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे सोमवारी प्रदर्शित झाले. नाट्य संगीतावर आधारित ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे गाणे सध्या चाहत्यांचा पसंतीस उतरत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांचा एक फोन आणि काँग्रेस आमदारांचे उपोषण मागे…!

News Desk

राजकीय मतभेद बाजूला ठेवून शांत डोक्याने विचार केला तर…राऊतांचा फडणवीसांना सल्ला 

News Desk

अखेर मराठवाड्यात दमदार पावसाची हजेरी

News Desk