HW News Marathi
महाराष्ट्र

‘सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है!’,अमृता फडणवीसांचा बड्डे स्पेशल फोटो!

मुंबई | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम त्यांच्या वेगवेगळ्या ट्विटमुळे चर्चेत येत असतात. अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका करणारे एक ट्विट केले होते ज्यात त्यांनी त्यांचं प्रत्यक्ष नाव घेतले नव्हते. काल (९ एप्रिल) अमृता फडणवीसांचा वाढदिवस होता. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज एक ट्विट केलं आहे. यावेळी त्यांनी ट्विटसोबत त्यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावर केक लावण्यात आला आहे. या फोटोला अमृता यांनी ‘सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है’, असं कॅप्शन दिलं आहे. तसेच, त्यांनी सगळ्यांचे आभारही मानले आहेत.

अमृता फडणवीस यांचं ट्विट

खरंतर अमृता फडणवीस यांचा काल वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्ताने त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या होत्या. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर सर्वांचे आभार मानले आहेत. अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावर ठिकठिकाणी केकचे ठिपके ठेवलेले दिसत आहेत. हा फोटो त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुक या दोन्ही अकाउंटवर शेअर केला आहे.

अमृता फडणवीस यांचा ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा

अमृता फडणवीस ट्विटरवर वारंवार शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधतात. दोन दिवसांपूर्वी राज्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा यावरुन राजकीय वातावरण पेटलेलं असताना अमृता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता हिंदीत निशाणा साधला होता. “पहचान कौन? एक राजा जो- महल की चौखट से निकलता नही अवाम से कभी मिलता नही सत्य और कर्म की राह पर चलता नही वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही महामारी का कहर उससे सम्हलता नही प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही ! सच है, धोखा कभी फलता नही। क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?”, असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्क्ष रुपाली चाकणकर यांनी काय केले ट्विट?

सब पहचानते है कौन? एक राणी जो- ,कभी महलों में रहा करती थी,फिर महल पाने को आंहे भरा करती थी,रानी बनने के बाद पता चला हैं,उसके आवाज में एक कला है,पहले सुरों पे फिर जनता पे कहर ढाती थी,वो महल के सैनिकों से प्रोग्राम टिकट बिक़वाती थी, महल छोड़ते समय वो दीवारों पे लिखवाती थी… असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांचा पाणउतारा केलेला दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

” पंचवीस वर्षे युतीत सडली हे कळायला इतका उशिर का लागला? ‘

News Desk

नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय? पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत,कॉंग्रेसचा भाजप आणि शिवसेनेवर वार …

News Desk

अमृता फडणवीसांचा खोचक सवाल तर आता रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर!

News Desk