HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

अमृता फडणवीसांच्या अमित शाह यांना ‘चाणक्य’ म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज (२२ ऑक्टोबर) वाढदिवस असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते विरोधी पक्षातील नेत्यांपासून सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून अमित शाह यांना शुभेच्छा देत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही अमित शाह यांना ट्विटरच्या माध्यमातून अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी अमित शाह यांचा उल्लेख आधुनिक भारताचे चाणक्य असा केला आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आधुनिक भारताचे चाणक्य अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असे ट्विट करत अमृता फडणवीस यांनी अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

Related posts

राफेल कराराचे सर्व लाभ थेट पंतप्रधानांना होत असल्याचा काँग्रेसचा आरोप

News Desk

1 मे पासून अधिका-यांची लालबत्ती गुल

News Desk

मेट्रोच्या कामासाठी पुन्हा एकदा झाडांचा बळी

rasika shinde