मुंबई | बंधपत्रित ( बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२९ मे) जाहीर केले. कोरोना लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळणार आहे. डॉक्टर्सना सुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही डॉक्टरांच्या वेत वाढीसंदर्भात ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
For doctors on contract and on bond, the Maharashtra State Govt has decided to not just enhance pay, but bring at par. They are our covid warriors and this was due.
(1/n)— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 29, 2020
वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना ६० हजारांच्या ऐवजी ७५ हजार रुपये मनधन मिळणार आहे. आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना ७० हजार ऐवजी ८५ हजार रुपये वेतन मिळणार आहे. इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना ५५ हजारांऐवजी ७० हजार आणि इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना ६५ हजारांऐवजी ८० हजार रुपये मानधन देण्यात येईल
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.