HW News Marathi
महाराष्ट्र

कॉंग्रेसमध्ये प्रवेशाच्या बातम्या खोट्या । आनंदराज आंबेडकर

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र ही माहीती खोटी असून असे काहीही होणार नाही, असे स्पष्टीकर आनंदराज आंबेडकर यांनी दिले आहे. आनंदराज आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे.

मी कोणत्याच पक्षात प्रवेश केला नसून रिपब्लिकन सेनेचे समर्थन हे वंचित बहुजन आघाडीस आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा संबंधच येत नाही असेही आनंदराज यांनी सांगितले आहे. कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याच्या बातम्या पुर्णपणे खोट्या आहे. दिल्लीत आमचा कुठलाही उमेदवार नाही. मी गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच आहे दिल्लीला जाण्याचा प्रश्नच नाही असेही आंबेडकर म्हणाले. सोबतच अशा बातम्या छापणाऱ्या वृत्तसंस्थांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकु असेही त्यांनी सांगितल आहे.

यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या बातमीला कुठलाही आधार नाही. या सर्व बातम्या निराधार असल्याचं वंचित बहुजन आघाडीकडून सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींनाही त्यांच्या कर्माचे फळ पंतप्रधानांनी दाखवले !

News Desk

“कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या निधनाने हानी”, मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

Aprna

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर काय म्हणाले छगन भुजबळ? 

News Desk