HW News Marathi
महाराष्ट्र

सीबीआयनंतर आता अनिल देशमुखांच्या मागे ईडी, मनी लॅाड्रींगप्रकरणी गुन्हा दाखल…

मुंबई । महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींत प्रचंड वाढ झाली आहे. तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याला 100 कोटी रुपये वसुलीचा आदेश दिल्याच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुखांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. आता दुसरीकडे मनी लॅाड्रींग प्रकरणात ईडीने सुद्धा देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे करण्याचे आदेश सचिन वाझे याला दिल्याचा आरोप केला होता. उच्च न्यायालयाने याबाबत चौकशी करुन अहवाल देण्याचा आदेश सीबीआयला दिला होता. सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करुन देशमुख यांच्या मुंबई, नागपूर येथील कार्यालये व निवासस्थानी छापे घातले होते. त्यात सीबीआयने अनेक महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती. त्यानंतर आता ईडी सक्रीय झाली असून त्यांनी मनी लाँड्रिगप्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

काय आहे प्रकरण?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणावरून बराच गोंधळ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली होती. सिंह यांच्याकडून तपास चुका झाल्याचं विधान अनिल देशमुख यांनी केल्यानंतर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला आहे.

सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं होतं. ज्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी परमबीर सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिलं आदेश

News Desk

कृषी कायद्याबाबत मोदी सरकार कोर्टाचीही दिशाभूल करेल, राजू शेट्टींचा आरोप

News Desk

महाविकासआघाडी सरकार तीन चाकी, मात्र स्टेअरिंग माझ्याच हातात !

News Desk