HW News Marathi
महाराष्ट्र

”अनिल देशमुखांचे PA चौकशीला सहकार्य करत नाही, सचिन वाझेला ओळखत नाही म्हणतात”, EDची माहिती

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे दोन्ही स्वीय सहाय्यकांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या दोन्ही आरोपींच्या ईडी कोठडीत ५ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दोघांनाही ६ जुलैपर्यंत ईडी कोठडीत राहावं लागणार आहे. पाच दिवसांपूर्वी सचिन वाझे आणि बार मालकांच्या जबाबवरुन कुंदन शिंदे आणि संजीव पालांडेला अटक करण्यात आली होती. या दोन्ही आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी ईडीनं पुन्हा एकदा मोठे खुलासे केले. सुरुवातीला ईडीनं न्यायालयाकडे दोघांचीही सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र आता आरोपींच्या कोठडीत ५ दिवसांची वाढ केली आहे.

संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे मिडीलमॅन असल्याचं ईडीनं म्हटलं आहे. तसंच 4 कोटी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे जाणार होते. हे पैसे कॅशमध्ये येत होते, असंही ईडीनं सांगितलं आहे. आरोपी चौकशीला सहकार्य करत नसून सचिन वाझेला ओळखत नसल्याच आरोपी म्हणतात. आम्ही काही इलेक्ट्रॉनिक पुरावे त्यांच्यासमोर ठेवले. तरी आरोपी सचिन वाझेला ओळखत नाही सांगतात, असं ईडीनं म्हटलं आहे.

दरम्यान, आयपीएस अधिकाऱ्या बदल्या करण्यात येत होत्या. ती लिस्ट तपासायची आहे. बदली झालेल्या IPS पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून चौकशी करायची असल्याचं ईडीनं न्यायालयात सांगितलं आहे. दोन्ही आरोपींचे आयकर डिटेल्ट तपासायचे असून मिळालेल्या कॅशचं काय झालं?, हे पैसे कुठे गेले याची चौकशी करायची असल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे, IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये काही इतर मंत्र्यांची नावं आली आहेत. त्यामुळे त्या यादीची तपासणी करायचं असल्याचंही ईडीनं म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्कायमेटच्या दाव्यानुसार गेल्या २४ तासात माथेरानमध्ये देशातील सर्वाधिक पाऊस

News Desk

कुठलीही गर्दी न करता कार्तिकी वारी साधेपणाने पार पाडा – मुख्यमंत्री

News Desk

विवा महाविद्यालयाची जागा आता कोरोनाच्या उपचारासाठी उपलब्ध

swarit