HW News Marathi
Covid-19

कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ४७ हजार पास वाटप

मुंबई | लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४ लाख ४७ हजार ७७४ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ६ लाख ०५ हजार ५८९ व्यक्तींना कॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे २२ मार्च ते ३ जून  या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,२२,४८४ गुन्हे नोंद झाले असून, २३,८२० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ६ कोटी ३८ लाख ८३ हजार ३५१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

हल्लेखोरांविरुध्द कडक कारवाई

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.

या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २५८ घटना घडल्या. त्यात ८३८ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० नंबर-१ लाख  फोन

पोलीसभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,००,१३८ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ७०६ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ६,०५,५८९ व्यक्ती Quarantine  आहेत. अशी माहिती देशमुख यांनी दिली.

 या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३० वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ७९,७७५ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ४ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

‘भारतात सध्या ब्रिटनसारखी स्थिती’ AIIMS च्या रणदीप गुलेरीयांचं गंभीर वक्तव्य

News Desk

देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत अमित शहा यांची लॉकडाऊनसंदर्भात चर्चा

News Desk