HW News Marathi
महाराष्ट्र

पोलीस खात्यात १२५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार – अनिल देशमुख 

नागपूर | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पोलिस, भरतीबाबत चर्चा सुरु असतानाच आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पोलीस खात्यात १२५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात ५३०० जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. तसेच १२५३८ जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. ते आज (११ जानेवारी) नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्य सरकार पोलीस भरतीच्या निर्णयावर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत.

गृह विभागाने २०१९ मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, ९ सप्टेंबर२०२०ला सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून ‘एसईबीसी’च्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, या निर्णयाला मराठा संघटना आणि नेत्यांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट आहे. मात्र, आता अनिल देशमुख यांच्या वक्तव्यामुळे गृह खाते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री स्वत:चे कुटुंब सुरक्षित ठेवू शकले नाहीत!

News Desk

शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर करता येईल का याबाबत केंद्राशी बातचीत करणार 

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वागत – महेश तपासे

News Desk