HW News Marathi
महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय आल्यावर ईडीला सामोरं जाणार- अनिल देशमुख

मुंबई | राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख सध्या ईडीच्या रडारवर आहेत. ईडीकडून त्यांना ३ वेळा समन्स गेला असून त्यांनी काही ना काही करणं देऊन ईडीसमोर जाणं टाळला आहे. यातच त्यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त केली गेली आहे. अनिल देशमुखांची ४ कोटी नव्हे तर ३०० कोटी मालमत्ता जप्त केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अनिल देशमुख हे काही दिवस कोणाच्याही संपर्कात नसल्याने ते अंडरग्राऊंड झाल्याची चर्चा हि होती. आता अनिल देशमुख हे खुद्द सगळ्यांसमोर आले व त्यांनी आपली बाजू मंडळी आहे.

वृत्तातून गैरसमज पसरवण्याचं काम

अनिल देशमुख अंडरग्राऊंड आहेत हि चर्चा रंगात असतंच त्यांचा एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या विडिओ मध्ये ते स्पष्ट बोले आहेत कि, ‘ ईडीकडून माझी ४ कोटींची मालमत्ता तात्पुरता जप्त झाले आहे. माझ्या मुलाने सलील देशमुख ने २०१६ मध्ये २ कोटी ६७ लाखांची जमीन घेतली होती, तीही जप्त करण्यात अली असून काही वृत्तपत्रांमध्ये ३०० कोटी जमीन जप्त झाली असून गैरसमज पसरवण्याचं काम चालू आहे.’

सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय आल्यावर ईडीला सामोरं जाणार

अनिल देशमुख यांनी पुढे म्हंटलं, ‘ मला ईडीकडून समन्स आला आहे, पण मी सर्वोच्च न्यायालयात याचिका नोंदवली आहे. जव्हा कोर्ट काय तोच योग्य निर्णय देईल मी ईडीला सामोरं जाणार’, असं देशमुखांनी स्पष्ट केलं आहे. ईडीने तीन वेळा समन्स देऊनही टाळाटाळ केल्यामुळे त्यांच्यावरचा संशय अजून वाढत असल्याचा स्पष्ट होतंय. आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल यावर लक्ष देणं आहे.

काय होतं नेमकं प्रकरण?

गेल्या काही महिन्यांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला असून, रविवारीही देशमुखांच्या दोन घरांवर ईडीने छाप टाकले होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. १०० कोटींचं प्रकरण चर्चेत आल्यानंतर ईडीने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तपास सुरू केला. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीच्या रडावर असून, देशमुख यांच्या मालमत्तांची झाडाझडतीही ईडीकडून केली जात आहे.

तसेच, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त केली असून, रविवारीही त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले. या छाप्यानंतर देशमुख यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अनिल देशमु ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आली आहे. अटकेच्या भीतीने देशमुख गायब झाले असल्याचं बोललं जात असून, ईडीकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांच्या सातबाराची कटकट मिटणार

swarit

तिवरे धरण दुर्घटनेसाठी शिवसेनेचे आमदार जबाबदार !

News Desk

राज्यभर तीव्र आंदोलन, मराठा आंदोलकांचा सरकारला इशारा

swarit