नागपूर | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे गृहमंत्री पदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरासह १० ठिकाणी झाडाझडती देखील सीबीआयने घेतली आहे. सीबीआयच्या या कारवाईनंतर प्रथमच माध्यमांसमोर आलेल्या अनिल देशमुख यांनी फार काही बोलण्याचे टाळत अतिशय मोजक्या शब्दांमध्येच प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अनिल देशमुख?
सीबीआयची टीम घरी तपासणीसाठी आली होती. त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. आता मी नागपुर जिल्ह्यात ज्या पद्धतीने करोना वाढतो आहे, या पार्श्वभूमीवर काही कोविड सेंटरला भेट देण्यासीठी काटोलला चाललो आहे.” असं अनिल देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले व त्यानंतर ते नियोजित ठिकाणी जाण्यासाठी रवाना देखील झाले.
Mumbai: A team of Central Bureau of Investigation (CBI) has left the residence of former Maharashtra Home Minister Anil Deshmukh after conducting searches
"We cooperated with CBI," says Deshmukh pic.twitter.com/YQQnlZGYPL
— ANI (@ANI) April 24, 2021
तसेच, “सीबीआयच्या पथकाला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करून मी कोरोनाच्या अनुषंगाने काटोल व नरखेड येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रांची पाहणी करण्यासाठी निघालो आहे.” असं ट्विट देखील अनिल देशमुख यांनी केलं आहे.
सीबीआयच्या पथकाला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करून मी कोरोनाच्या अनुषंगाने काटोल व नरखेड येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रांची पाहणी करण्यासाठी निघालो आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 24, 2021
काय आहे प्रकरण?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणावरून बराच गोंधळ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली होती. सिंह यांच्याकडून तपास चुका झाल्याचं विधान अनिल देशमुख यांनी केल्यानंतर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला आहे.
सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं होतं. ज्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी परमबीर सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.