HW News Marathi
Covid-19

परप्रांतीयांना आपापल्या राज्यात जाण्याकरता नोडल अधिकाऱ्यांकडे फॉर्म भरुन द्यावा लागणार

मुंबई | लॉकडाउनमुळे गेल्या महिनाभरापासून विविध राज्यांत लोक अडकून पडलेले आहेत. अशा मजूर, विद्यार्थी, पर्यटक, धार्मिक यात्रेकरूंना आपापल्या घरी जाण्याची मुभा दिली जाणार आहे. त्यासाठी सरकारने आदेश काढले असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

त्याकरीता प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला नोडल अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. आपली सर्व माहिती या जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यायची आहे. यात आपले नाव मोबाईल नंबर, कोणत्या राज्यात अडकले आहात त्या राज्याचे नाव त्यातील जिल्ह्याचे नाव, त्यातील गावाचे नाव हे त्या फॉर्ममध्ये भरुन द्यायचे आहे.

तसेच, तुम्ही कुंटुंबासहित आहात की ग्रुपसोबत आहात याची माहितीही त्यात द्यायची आहे. आणि तुमच्याकडे स्वत:चे वाहन आहे की नाही याची माहितीतही द्यावी लागेल. ही सर्व माहिती दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या राज्यात, गावात जाऊ शकता, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive | विदेश बहोत देख लिया, अब अपना देश देख लो !

News Desk

देशात कोरोना रूग्णांच्या संख्येने ओलांडला ४० हजारांचा टप्पा

News Desk

राज्यात कोरोनामुक्तांचा आकडा मोठा ! तर रिकव्हरी रेट 95.48%

News Desk