HW News Marathi
महाराष्ट्र

‘भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत पण…’गृहमंत्र्यांचे त्या चौकशीवर स्पष्टीकरण

मुंबई | भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासह अन्य सेलेब्रिटींनी काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनावर केलेलं ट्वीट केंद्र सरकारच्या दबावामुळे तर केलं नाही ना, याबाबत आता राज्य सरकारकडून चौकशी करण्यात येणार आहे. मात्र या मुद्द्यावरून भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, आता याबाबत अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत. पण त्यांच्यावर कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दबाव टाकला का? त्या नेत्याची चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे,’ असं ट्वीट अनिल देशमुख यांनी केलं आहे.

काय केले होते देवेंद्र फडणवीसांनी ट्विट?

‘कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे’, असे संतापजनक ट्विट फडणवीसांनी केले आहे.

सचिन सावंत यांची भूमिका

‘भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक आम्ही केलेल्या मागणीचा विपर्यास करून बोंब ठोकत आहे. आम्ही भाजपची चौकशी करावी अशी मागणी केली आहे, सेलेब्रिटींची नाही. उलट सेलेब्रिटींना भाजपपासून संरक्षण द्यावे ही मागणी केली आहे. देशपातळीवर भाजपाकडून लोकशाही मानक पायदळी तुडवले जात आहेत,’ असा पलटवार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

‘काही सेलेब्रेटींवर भाजप दबाव आणून ट्वीट करावयास भाग पाडू शकतो. काही सेलिब्रिटींच्या ट्वीटमध्ये Amicable हा शब्द समान आहे. सायना नेहवाल आणि अक्षय कुमार यांचे ट्वीट एकाच शब्दात आहेत. सुनील शेट्टीने आपल्या ट्विटरला भाजपा पदाधिकारी हितेश जैन याला टॅग केलं आहे. यातून भाजपा कनेक्शन दिसते. अनेक जणांनी याअगोदर राजकीय ट्वीट कधीच केलं नाही. त्यामुळे त्यांना दबाव आणून भाग पाडले जात आहे का? याची चौकशी आम्ही मागितली आहे. आमच्या विरोधात ही कोणतीही भीती न बाळगता त्यांना बोलता आले पाहिजे. पण जर भाजपची भीती असेल तर ती दूर झाली पाहिजे,’ असंही सचिन सावंत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीस शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार

News Desk

“मी असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे”- उदयनराजे भोसले

News Desk

प्रधानमंत्र्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Manasi Devkar