HW News Marathi
महाराष्ट्र

गोपीचंद पडळकर यांचा ‘तो’ प्रयत्न पोलीसांनी हाणून पाडला – गृहमंत्री

जेजुरी | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आणि पोलिसांशी झटापट केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे. पुतळ्याचं उद्घाटन झालं असल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा गोपीचंद पडळकर यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पोलीस त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करत आहेत.

उद्या (१३ फेब्रुवारी) ४.३० वाजता शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे, असं अनिल देशमुख म्हणाले. तर आजवर अनेक वेळा बेकायदेशीर उद्घाटनं झाली पण कधी गुन्हे दाखल झाले नाहीत. मात्र आमदार पडळकर प्रकरणी लगेच गुन्हा दाखल केला गेला, असं विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. आमदार गोपीचंद पडळकर हे सतत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर टीका करत असतात. आता पुन्हा गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना चॅलेंज केलं आहे. जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा अनावरणावरुन आज पहाटे चांगलाच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साताऱ्यात शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर कार्यकर्ते आक्रमक!

News Desk

जेव्हा वचन दिलेत तेव्हा पासून ५०० चौ. फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करा!

Aprna

परळीतील व्यापाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी १६ सावकारांवर गुन्हा

Aprna