HW News Marathi
देश / विदेश

वायुसेनेच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचा वैमानिक शहीद

श्रीनगर | जम्मू-काश्‍मीरमधील बडगाममध्ये बुधवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. त्या दुर्घटनेमध्ये डीजीपीनगर बँक कॉलनी येथे 12 नंबरच्या बंगल्यात रहिवासी असलेले स्कॉड्रन लिडर निनाद अनिल मांडवगणे (वय 33) शहीद झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी , दोन वर्षांची कन्या, आई-वडील, जर्मनीतील धाकटा बंधू असा मोठा आप्त परिवार आहे. नाशिकचे निनाद हे औरंगबाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) 26व्या कोर्सचे माजी विद्यार्थी होते. तेथून त्यांची निवड पुणे येथे एनडीएत झाली आणि ते हेलिकॉप्टर पायलट झाले.

बुधवारी सकाळी झालेल्या हेलिकॉप्टरच्या अपघातात निनादचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या. तसेच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती समोर आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मॅगी पुन्हा संकटात

News Desk

शरद पवारांनी मोदींच्या विरुद्ध नाही तर श्रीरामांच्या विरोधात विधान केले – उमा भारती

News Desk

आता सुटीच्या दिवशीही मिळणार लस! केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

News Desk