HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल परबांच्या अडचणीत वाढ? सोमय्यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय पथकाने परबांच्या रिसॉर्टची केली पाहणी

रत्नागिरी | शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय पर्यावरण विभागाने परब यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील अलिशान रिसॉर्टची आज (१२ जून) पाहणी केली आहे. सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेत अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टबद्दल तक्रार केली होती. हा रिसॉर्ट परब यांनी काळ्या पैशातून बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. सोमय्या यांनी याबाबतची तक्रार फक्त जावडेकरच नाही तर ED, CBI, आयकर विभाग आणि महसूल मंत्रालयाकडेही केली आहे.

अनिल परब यांचं दापोली तालुक्यातील मुरुडमध्ये एक अलिशान रिसॉर्ट बांधण्यात आलं आहे. आज केंद्रीय पथकाकडून या साई रिसॉर्टची पाहणी करण्यात आलं. कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपये खर्चुन अनिल परब यांनी समुद्रकिनारी बेकायदेशीर पॉपर्टी खरेदी करुन साई रिसॉर्ट बांधले आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांनी त्याबाबत केंद्रीय पर्यावरण विभागाकडे तक्रार केली. या तक्ररीची दखल घेत केंद्रीय पथकाने आज या रिसॉर्टची पाहणी केली आहे.

सोमय्यांची तक्रार काय आहे?

“पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे मी भेट घेतली. मंत्री अनिल परब यांनी लॉक डाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे ₹१० कोटीचा ( काळा पैसा) बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून पर्यावरण मंत्रालयाची विशेष टीम जाणार. ED, CBI, आयकर विभाग, महसूल मंत्रालय कडे ही मी तक्रार केली आहे’, असं ट्वीट करत सोमय्या यांनी याबाबत माहिती दिली होती.

अनिल परबांनी काय उत्तर दिलं?

किरीय सोमय्या यांच्या या आरोपांवर अनिल परब यांनीही उत्तर दिलंय. पत्रकारांनी सोमय्यांच्या आरोपांबाबत विचारलं असता,सोमय्यांच्या आरोपांना आम्ही त्या त्या प्लॅटफॉर्मवर उत्तर देऊ, असं अनिल परब म्हणाले होते.

सचिन वाझेचे आरोप, परबांकडून बाळासाहेबांची शपथ

“दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवसांपासून आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण आधीपासून माहिती होतं. सचिन वाझे आज पत्र देणार होता त्यामुळे तिसरी विकेट काढणार असं भाजपला आधीच माहिती होतं. एक आरोप माझ्यावर, एक अनिल देशमुख आणि एक आरोप अजित पवारांच्या जवळचा माणूस म्हणून घोडावत यांचं नाव घेण्यात आलं आहे”, असं परब यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण मिळवण्यासाठी संभाजीराजेंनी मांडले ३ पर्याय

News Desk

दिल्लीत जेरबंद केलेला दहशतवादी धारावीतील तर गृहमंत्र्यांनी तातडीने बोलावली बैठक!

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा;शहिदांना अभिवादन 

News Desk