HW News Marathi
महाराष्ट्र

‘अनिल परब उद्योग करत बसतात’, निलेश राणेंची पुन्हा एकदा टीका!

मुंबई। शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आता पुन्हा एकदा निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. एसटी कर्मचाऱ्यांसमोरील गंभीर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असताना निलेश राणे यांनी ट्विट करत अनिल परब यांना सुनावलं आहे. “शुक्रवारी एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. परिवहन खाते अनिल परब यांच्याकडे आहे. पण ते नसते उद्योग करत बसतात”, असं म्हणत यावेळी एकेरीत उल्लेख करत निलेश राणेंनी अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.

पण ते नसते उद्योग करत बसतात

ट्विटमध्ये म्हणतात कि, “मागील १७ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नाही. आता तर जुलै महिन्याचा पगार ऑगस्ट महिना संपायला आला तरी मिळालेला नाही. शुक्रवारी एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. परिवहन खाते अनिल परब यांच्याकडे आहे. पण ते नसते उद्योग करत बसतात. एसटी गाड्या मंत्रालयाच्या आवारात उभ्या करा.

४५ वर्षीय चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना

वेळेवर पगार मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या धुळे जिल्ह्यातील राज्य परिवहन मंडळांच्या ४५ वर्षीय चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक समोर आली. त्याचसोबाबत, वेळेवर पगार होत नसल्याने एसटीचे अनेक कर्मचारी मोठ्या अडचणीत सापडले असून परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी अनिल परब यांना सुनावलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपाची पध्दत पुन्हा एकदा पुढे आली

News Desk

“त्यांना अक्कलेचे धडे मिळाले”, नाव न घेता नारायण राणेंचा अजित पवारांना टोला

Aprna

पंकजा मुंडेंनी घेतली संभाजीराजेंची सदिच्छा भेट

Ruchita Chowdhary