HW News Marathi
महाराष्ट्र

“राज ठाकरे चौकशीसाठी निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला ?”

मुंबई | “राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला ?”, असा खोचक सवाल करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कोहिनूर मिल ३ प्रकरणी ईडीकडून राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज (२२ ऑगस्ट) थोड्याच वेळापूर्वी राज ठाकरे सहकुटुंब ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले. तर आता त्यांच्या चौकशीला देखील सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, राज ठाकरे हे ईडीच्या चौकशीसाठी सहकुटुंब गेल्याने अंजली दमानिया यांनी राज यांच्यावर सडकून केली आहे.

अंजली दमानिया यांनी ट्विटच्या माध्यमातून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ”राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण ? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा ? की सहानूभुती गोळा करण्याचा हा प्रयत्न” असे ट्विट करत अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, राज ठाकरे हे थोड्याच वेळापूर्वी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.

नुकतीच राज यांच्या चौकशीला देखील सुरुवात झाली आहे. थोड्यच वेळापूर्वी राज ठाकरे हे पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे हे देखील ईडी कार्यालयाकडे रवाना झाले होते. मात्र, ईडीच्या कार्यालयात फक्त राज ठाकरे यांनाच प्रवेश मिळाला असून त्यांचे कुटुंबीय जवळच्या ‘ग्रँड हॉटेल’ थांबल्याची माहिती मिळत आहे. राज यांची ही चौकशी साधारणतः ४ ते ५ तास चालण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेत उमेदवार निवडून येण्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांचे नाही !

News Desk

बँकिंग कायदा दुरुस्तीविरोधात लढा उभारा, शरद पवारांचा केंद्रविरुद्ध लढा

News Desk

मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते!

News Desk