HW News Marathi
महाराष्ट्र

भूखंड घोटाळ्यात फडणवीसांचीही चौकशी करा, अंजली दमानिया यांनी केली कोर्टात मागणी

पुणे | माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं नाव आलेल्या भूखंड घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. फडणवीसांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदार अंजली दमानिया यांनी वकील अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत न्यायालयात लेखी मागणी केली आहे.

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बैठकीतील सगळे पुरावे- मिनिट्स ऑफ मीटिंग रद्द करण्याचे आदेश माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, असा आरोप अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यामुळे एसीबीने भूखंड घोटाळ्यात कोणाची चौकशी करणं आवश्यक आहे, याची यादीच सरोदेंनी न्यायालयात दिली आहे.

भूखंड घोटाळा प्रकरणी आता कोणाची चौकशी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन कागदपत्रे आणि व्यवहार प्रक्रिया तपासली जाणार असून यावर २३ फेब्रुवारीला न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणेकरांनी गव्यास मारले ते पाकिस्तान-चीनच्या चिथावणीमुळेच! सामनातून पुण्यावर टिका करत दानवेंवर निशाणा

News Desk

महाजाॅब्सवरून शिवसेनेने काँग्रेसकडे व्यक्त केली दिलगिरी !

News Desk

परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं ! उच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना…

News Desk