HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळातील ‘त्या’ नव्या १३ मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरु होती. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क देखील लावण्यात आले होते. बहुप्रतीक्षित असा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज (१६ जून) पार पडला आहे. या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह १३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी या १३ नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली असून आता या सर्व मंत्र्यांची खाती देखील जाहीर झाली आहेत. तर जाणून घेऊया कोणत्या मंत्र्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कॅबिनेट मंत्री

  • राधाकृष्ण विखे पाटील – गृहनिर्माण खाते
  • आशिष शेलार – शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
  • जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) – रोजगार हमी व फलोत्पादन
  • तानाजी सावंत (शिवसेना) – जलसंधारण
  • संजय कुटे – कामगार, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण
  • सुरेश खाडे – सामाजिक व विशेष सहाय्य मंत्री खाते
  • डॉ. अनिल बोंडे – कृषी
  • डॉ. अशोक उईके – आदिवासी विकास खाते
  • राम शिंदे – पणन व वस्त्रोद्योग
  • संभाजी पाटील निलंगेकर – अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण
  • जयकुमार रावल – अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार
  • सुभाष देशमुख – सहकार, मदत व पुनर्वसन

राजमंत्री

  • योगेश सागर – नगरविकास खाते
  • अतुल सावे – उद्योग आणि खणीकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ
  • संजय उर्फ बाळा भेगडे – कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन
  • परिणय फुके – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) वने, आदिवासी विकास
  • अविनाश महातेकर – सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्णब गोस्वामींसाठी राज्यपालांची गृहमंत्र्यांना सूचना, कुटुंबीयांना भेटू देण्याचे दिले निर्देश

News Desk

पाटण विधानसभा मतदार संघातील पाणी पुरवठा योजनांचा शंभूराज देसाईंनी घेतला आढावा

Aprna

शरद पवार रविवारपासून मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर…

News Desk