HW News Marathi
महाराष्ट्र

सार्वजनिक बांधकाम विभागमध्ये मराठा आरक्षणाच्या पहिल्या नियुक्त्या जाहीर

मुंबई | राज्य शासनाने सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाला (एसईबीसी) दिलेल्या १३ टक्के आरक्षणानुसार नोकरीमध्ये नियुक्त्या देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गट बमधील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गातील रिक्तपदांवर मराठा समाजातील ३४ जणांच्या एसईबीसी प्रवर्गातील १३ टक्के कोट्यातून पहिल्या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण अंमलबजावणी संदर्भातील मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सार्वजनिक बांधकाम विभागमधील एसईबीसी आरक्षणाची राज्यात प्रथम अमंलबजावणी करण्यात येणारा विभाग ठरला असल्याची माहिती मिळाली आहे. मराठा समाज आरक्षण कायदा नोव्हेंबर २०१७ मध्ये लागू झाल्यानंतर शासनाने हा महाभरतीचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांच्या जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली.

न्यायालयाने नोकऱ्यांमध्ये एसईबीसी प्रवर्गातून १३ टक्के आरक्षण देण्याचा निकाल दिला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त होणाऱ्या ४०५ संभाव्य पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर ३०० पदांचे आदेश काढण्यात आले असून यामध्ये एसईबीसी प्रवर्गातील ३४ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहमंत्री पदाच्या बदलीच्या चर्चेवर कॉंग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

‘परमबीर सिंह यांची हायकोर्टात याचिका’, चांदिवाल आयोगाची गरच काय!

News Desk

दाऊदला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणावे, रोहित पवारांची पंतप्रधानांना विनंती

News Desk