HW News Marathi
देश / विदेश

संतापजनक ! संजय राठोडांसोबत चित्रा वाघ यांचे ‘मोर्फ’ केलेले आक्षेपार्ह फोटोज व्हायरल

मुंबई । राज्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण रोज नवेनवे वळण घेत असल्याने राजकीय वातावरण पेटत आहे. या प्रकरणात शिवसेना नेते आणिवनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. भाजपने संजय राठोडविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेषतः भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा करत आहेत, धक्कादायक खुलासे करत आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांची बदनामी करण्याचा अत्यंत गलिच्छ प्रकार सोशल मीडियावर सुरू झाला आहे.

चित्रा वाघ यांचे संजय राठोड यांच्यासोबतचे मॉर्फ केलेले आक्षेपार्ह फोटोज सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. चित्रा वाघ यांचा त्यांच्या पतीसोबतचा एक फोटो मॉर्फ करत त्याऐवजी संजय राठोड यांचा फोटो वापरुन तो व्हायरल केला जात आहे. या संपूर्ण प्रकारावर चित्रा वाघ यांनी अत्यंत संतप्त आणि उद्विग्न अशी प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे याबाबतची तक्रार देखील केली आहे. तसेच दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनाही यासंदर्भात चित्रा वाघ यांनी कल्पना दिली आहे.

चित्रा वाघ या संपूर्ण प्रकरणी प्रतिक्रिया देताना Tv9 या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या की, “महाराष्ट्रात अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं आता गुन्हा झाला आहे काय ? जे काम पोलिसांचं आहे ते पोलिसांनी केलं असतं, जे काम सरकारचं आहे ते सरकारनं केलं असतं. तर आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची काय गरज होती ? स्वतः काही करायचं नाही आणि अशा पद्धतीनं फौज उभी करायची. हे जे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल केले जात आहेत ते करून नेमकं तुम्ही काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात ?”, असा सवालही चित्रा वाघ यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

केवळ मोर्फ फोटोज नव्हे तर चित्रा वाघ शिवीगाळ करणारे आणि धमक्यांचेही फोन आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चित्रा वाघ यांनी सातत्याने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचप्रमाणे, “संजय राठोड यांचा राजीनामा घेईपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही”, असा थेट इशाराच भाजपकडून देण्यात आला आहे. त्यामुळे, महाविकासआघाडी सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महात्मा गांधींबाबत हेगडेंचे वादग्रस्त वक्तव्य, देशातील राजकारण पेटण्यास सुरुवात

swarit

काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा

News Desk

मराठी माणसामुळे त्रिपुरात भाजपची सत्ता

News Desk