मुंबई | इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. अर्णब गोस्वामी यांची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर काही तासातच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका (अपील) दाखल केली असून त्यावर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या सुटीतील न्यायपीठापुढे सुनावणी सुरु आहे.
अर्णब गोस्वामी यांच्या वतीने हरिश साळवे बाजू मांडत असून यावेळी त्यांनी युक्तिवाद करताना अन्वय नाईक यांनी कशा पद्धतीने आपल्या आईची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली हे सांगितलं. याशिवाय अर्णब गोस्वामी यांनी सर्वांचे पैसे दिले होते हे कागदपत्रांमधून स्पष्ट होत असल्याचंही म्हटलं. अन्वय नाईक यांची कंपनी Concorde designs सात वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान अर्णब गोस्वामी यांच्यावतीने युक्तिवाद करताना हरिश साळवे म्हणाले की, “अन्वय नाईक यांची कंपनी सात वर्षांपासून आर्थिक अडचणीत होती. त्यांनी आपल्या आईची हत्या करुन मग आत्महत्या केली, अशीही शंका आहे. अर्णब गोस्वामी यांनी सर्व वेंडर्सना नियमित पैसे दिले आहेत.” तसंच हे प्रकरण पुन्हा सुरु करण्यासाठी नियमांचं पालन केलेलं नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
[VACATION BENCH HEARING: Arnab Goswami vs State of Maharashtra]
Supreme Court bench led by Justice DY Chandrachud to begin hearing appeal against Bombay HC order denying #ArnabGoswami interim bail in 2018 abetment to suicide case at 10.30 am#SupremeCourt #ArnabGoswamiArrested pic.twitter.com/Cy1MpLatnz
— Bar & Bench (@barandbench) November 11, 2020
हरिश साळवे यांनीयावेळी अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्हीविरोधात नुकत्याच दाखल झालेल्या गुन्ह्यांचा दाखला दिला. ते म्हणाले की, “एकामागोमाग एक गुन्हे दाखल केले जात आहेत. हे प्रकरण गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरुन पुन्हा सुरु करण्यात आलं. दंडाधिकाऱ्यांना अर्णब गोस्वामी यांना वैयक्तिक बॉण्डवर सोडून द्यायला हवं होतं. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं पाहिजे.” तसंच अर्णब गोस्वामी यांची सुटका केली तर आभाळ कोसळणार नाही,” असंही साळवे म्हणाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.