HW News Marathi
महाराष्ट्र

अन्वय नाईक यांची ‘ती’ सुसाईड नोट आली समोर

मुंबई | रिपब्लिक टीव्ही चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज रायगड पोलिसांनी अटक केली. ही अटक २०१८ मध्ये इंटिरिअर डिझाइनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणासंदर्भात करण्यात आली. अन्वय नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांचा नावाचा उल्लेख होता. ही सुसाईड नोट पहिल्यांदा समोर आली आहे.

अन्वय नाईक यांनी रिपब्लिकन tv चॅनलच्या स्टुडीओच्या इंटेरियर डिझाईनचे काम केले होते. यासाठी 5 कोटी 40 लाख एवढे बिल अर्णव गोस्वामी यांच्याकडून घेणे होते. परंतु वारंवार बिल मागूनही अर्णव गोस्वामी यांच्याकडून बिल दिले जात नव्हते. त्यामुळे मानसिक तणावाखाली अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती.

आत्महत्येपूर्वी नाईक यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येस अर्णब याला जबाबदार धरलं होतं. तसेच त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली आहे. या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून रायगड पोलिसांकडून कलम 306 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पांगरखेडा येथे आगीत गुरेढोरे मृत्युमुखी

News Desk

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावरुन फडणवीसांचा टोला!

News Desk

‘राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी, म्हणाले….’

News Desk