HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची काल (५ ऑक्टोबर) राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५५४३ उमेदवारांपैकी ४७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ७९८ उमेदवारांचे अर्ज नामंजुर झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे.

तसेच गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अर्जाच्या माहितीवर घेतलेले आक्षेपही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावून त्यांचे अर्ज वैध ठरविले. राष्ट्रवादीचा गड असलेल्या चिंचवड विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद झाला आहे. तसेच कुर्ल्यात देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला झटका बसला आहे. तर औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला.

४ हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध

नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ५६, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात १५४, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात ७५, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात १०१, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६०, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात १५१ , वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५९ , नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८१ , भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६६ , गोंदीया जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७१, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४४, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ९०, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात १२५, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ३२७ , हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५४, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८१ , जालना जिल्ह्यात ५ मतदारसंघात १३३ , औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात २०८ , नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात २१२ , पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६९, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात २५१ , मुंबई उपनगर जिल्ह्यात २५ मतदारसंघात २७२ (वांद्रे पश्चिम मतदारसंघाची माहिती रात्री उशीरापर्यंत अप्राप्त), मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ८४ , रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ११२ , पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात ३७२ , अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८२ , बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात २०२, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात १२० , उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८२ , सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात २३७ , सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात १०८ , रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात ४० , सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात २७ , कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात १८६ , सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात १११ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इच्छुकांना पक्षात परत घेण्यात कोणतीही अडचण नाही, अनेकजण संपर्कात !

News Desk

धनंजय मुंडेला संपविण्याचा प्रयत्न, नवीन आलेले भाऊ विष कालवत आहेत ! 

News Desk

पंढरपूर पोटनिवडणूक: भाजपकडून समाधान अवताडेंना उमेदवारी,आज अर्ज दाखल करण्यासाठी नेत्यांची फौज येणार

News Desk