नवी दिल्ली | देशभरात कोरोना व्हायरस वेगाने वाढत असून देशात कोरोना बाधितांची संख्या ७०० पार गेला आहे. या पार्श्वभूमीवर देशावर ओढावलेल्या संकटचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर पुढे सरसावले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी आता भारतीय लष्कर सज्ज झाले असून कोरोनाविरोद्ध लढाईसाठी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन नमस्ते’ची अभियानाला सुरुवात करणार आहेत. कोरोनाविरोधच्या युद्धाची घोषणा लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी स्वतः केली.
Indian Army has code-named its anti #COVID19 operations as Operation Namaste. Army has, so far, established eight quarantine facilities across the country. pic.twitter.com/bmQh1Zr4Ua
— ANI (@ANI) March 27, 2020
नमस्ते अभियानात लष्कराने देशभरात ८ क्वारंटाइन सेंटर्स उभारले आहेत. तसेच लष्कराने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. यासाठी लष्कराने सदर्न कमांड, ईस्टर्न कमांड, वेस्टर्न कमांड, सेंट्रल कंमांड, नॉर्दन कमांड, साऊथ वेस्टर्न कमांड आणि दिल्ली मुख्यालयात करोना हेल्पलाइन सेंटर्स उभारण्यात आले आहेत. या सेंटर्सच्या माध्यमातून करोनाची लागण झालेल्या नागरिकांना मदत पुरवली जाणार आहे, अशी माहिती लष्करप्रमुखांनी यावेळी दिली. या परिस्थितीत सर्व लष्करी अधिकारी आणि जवानांच्या सुट्ट्यांवर बंदी घालण्यात आली असून अशाच प्रकारे सन २००१ मध्ये पराक्रम अभियानाच्या वेळी ८ ते १० महिन्यांच्या कालावधीत कुणालाही सुट्टी देण्यात आलेली नव्हती, अशी माहिती देत लष्करप्रमुखांनी जुन्या आठवणी जागवल्या.
To protect the country it is important for us to keep ourselves safe & fit. Keeping this in mind, we had issued 2/3 advisories in last few weeks which should be followed: Army Chief General MM Naravane https://t.co/F1GPQp8Ew0
— ANI (@ANI) March 27, 2020
सैन्यदलाला फीट ठेवणे
नरवणे म्हणाले, कोरोना व्हायरसच्या लढाईसाठी सैन्यदलाला फीट ठेवणे माझी जबाबदारी आहे.. यामुळे, देशाच्या रक्षणासाठी आम्हाला स्वतःला सुरक्षित आणि फिट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हे पाहता काही सूचनाही देण्यात आल्या आहेत. आपण आपल्या जवळच्या नातलगांची चिंता करू नये कारण लष्कर त्यांची योग्य पद्धतीने देखभाल करत आहे, असे ते म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.