HW News Marathi
महाराष्ट्र

अर्णब गोस्वामींना हायकोर्टाकडून दिलासा नाही,जामीन अर्ज फेटाळला!

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासह नितीश सारडा आणि फिरोज शेख यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अर्णब गोस्वामी आणि इतर दोघांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला आहे. नियमाप्रमाणे जामीनासाठी आधी सत्र न्यायालयात याचिका करावी असे निर्देश उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना दिले आहेत. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

अर्णब यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी शनिवारी (७ नोव्हेंबर) संपली आहे. त्यावेळी सगळ्या पक्षकारांच्या युक्तिवादांचा विचार करून आम्हाला निर्णय द्यायचा असल्याने आता या वेळी आम्ही अंतरिम आदेश देऊ शकत नाही. आम्ही अर्णब यांच्या अर्जावरील निर्णय लवकरात लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न करू, असं स्पष्ट करत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने अर्णब यांना तातडीचा दिलासा न देताच याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. दिवाळीची सुटी असल्याने निर्णय जाहीर करण्यासंदर्भात आम्हाला प्रशासकीय पातळीवर मुख्य न्यायमूर्तींची परवानगी घ्यावी लागेल, असंही न्यायालयाने नमूद केलं होतं.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने आज अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवरील निर्णय दिला. न्यायालयाने गोस्वामी यांची जामीनाची मागणी फेटाळून लावली. आमचे विशेषाधिकार वापरून तातडीचा अंतरिम जामीन देण्याचे प्रकरण नाही. त्यामुळे आरोपी कनिष्ठ न्यायालयात जाऊ शकतो. कनिष्ठ न्यायालय चार दिवसांच्या कालावधीत त्यावर निर्णय घेईल, असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर !

News Desk

Pune wall collapse : निष्काळजीपणा करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा !

News Desk

‘मुंबई’ला कर्नाटकची म्हणणाऱ्या कर्नाटक उपमुख्यमंत्र्यांना अजित पवारांनी झापलं!

News Desk