मुंबई | सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांना देण्यात आलेल्या धमकीवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगलं आहे. त्यावरुन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. अदर पूनावाला यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे.
माणसाचा जीव वाचवण्याचं काम ते करतात, ते ही महाराष्ट्रात. याचा आम्हाला आदर आहे. शिवसेना आक्रमक संघटना असली तरी आम्ही ही भाषा वापरत नाही, असं शब्दात शिवसेनेवर केल्या जाणाऱ्या आरोपांना अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राजू शेट्टी यांनी एक व्हिडीओ केला. त्यांच्या संघटनेचं नाव स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. त्यांनी त्याचा उल्लेख SS असा केला, हे SS म्हणजे शिवसेना समजले. पूनावाला यांना धमक्या देऊन आम्ही लोकांचे जीव वाचवण्याचं काम कसं करणार? शिवसेनेची बदनामी करण्यासाठी आरोप केला जात आहे. शिवसेनेनं धमकी दिलेली नाही.
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या उक्तीप्रमाणे यांना सत्तेवर येण्याची घाई झाली आहे. पश्चिम बंगालच्या जनतेनं यांना धडा शिकवला. जो महाराष्ट्राने आधीच दिला होता, असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद नसते तर हे दुर्बिणीने शोधूनही महाराष्ट्रात सापडले नसते, अशी खोचक टीकाही सावंत यांनी भाजपवर केली आहे.
तसेच, कोरोनासंदर्भात केंद्र सरकारचे वाभाडे जगभरात निघत आहेत. उरलेसुरले कालच्या निवडणूक निकालात गेले आहेत. देशात क्रांती घडत आहे. महाराष्ट्राने क्रांती घडवण्याला सुरुवात केली. गुडघ्याला बाशिंग बांधू नये.
पंढरपूरच्या निकालानंतर राज्य सरकारवर संक्रमण येणार असेल तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या तिन्ही मोठ्या राज्यात तुमचा पराभव झाला आहे. त्यामुळे केंद्रातील सरकारने पहिला राजीनामा द्यायला हवा. त्यानंतर आमच्या सरकारवर बोला असंही अरविंद सावंत यांनी भाजपला बजावलं आहे.
काय म्हणाले होते आशिष शेलार?
पंढरपूर निकालावर भाष्य करताना भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. जे स्वत: कुबड्यांवर आहेत आणि ज्यांचे पहिले पाऊलचं कुबड्यांशिवाय पडत नाही. त्यांची बेळगाव आणि पश्चिम बंगालवर बोलण्याची औकात नाही असा टोला शेलारांनी नाव न घेता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला होता. त्यावरच अरविंद सावंत यांनी शेलारांना सुनावले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.